संस्थेबद्दल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युथ विंग, मुंबईच्या अधिकृत वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे.

प्रगती, सर्वसमावेशकता आणि युवा सशक्तीकरणासाठी कटिबद्ध – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबई

मुंबईतील तरुणांना राजकीय आणि सामाजिक बदलांचे वाहक बनवण्यासाठी समर्पित असलेली आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेस युथ विंग एक गतिशील व्यासपीठ आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या सशक्त मार्गदर्शनाखाली, आणि मुंबई अध्यक्ष श्री. सुनील गिरी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आम्ही तरुणांच्या उत्साह, नवोन्मेष आणि सामर्थ्याचा उपयोग करून सकारात्मक बदल घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

आमचा उद्देश आणि ध्येय
लोकशाही, समता आणि सामाजिक न्याय या मुल्यांवर आधारलेल्या आमच्या विंगचे मुख्य उद्दिष्ट आहे मुंबईच्या तरुणांना एकत्र आणणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या सहभागातून शहराच्या उज्ज्वल भविष्याची उभारणी करणे. आम्ही एक असा मंच निर्माण करत आहोत जिथे तरुण त्यांचे विचार मांडू शकतील, धोरणात्मक चर्चांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतील आणि शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील.

नेतृत्वाचे खंबीर पाठबळ
राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री. धीरज शर्मा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनीलजी तटकरे, आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री. सुरजजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, आमची युथ विंग तरुणांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी आणि सामाजिक योगदानाची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

तरुणांसाठी एकत्रित व्यासपीठ
आमचे ध्येय आहे विविध पार्श्वभूमीतील तरुणांना एकत्र आणणे, विचारांची देवाणघेवाण घडवणे, आणि एकत्रित प्रयत्नांतून प्रगतीशील आणि समतोल समाज उभारणे. आम्ही मुंबईतील तरुणाईसाठी एक असं प्रेरणादायी व्यासपीठ उभं करत आहोत जिथे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीला वाव मिळेल.

सकारात्मक बदलाच्या प्रवासात सहभागी व्हा
आमच्या सशक्तीकरण, सहभाग आणि परिवर्तनाच्या प्रवासाचा भाग बना. आमच्या उपक्रमांना पाठिंबा द्या, कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि मुंबईतील तरुणाईच्या भविष्यासाठी प्रेरक शक्ती व्हा.

आपल्या ऊर्जेने आणि समर्थनाने आपण एकत्र येऊ शकतो, एक सक्षम, सर्वसमावेशक आणि प्रगतिशील मुंबई घडवण्यासाठी. चला, या प्रवासाला सुरुवात करूया!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व

म. श्री. अजित पवार

राष्ट्रीय अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

म. श्री. सुनील तटकरे

महाराष्ट्र अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

म. श्री. प्रफुल्ल पटेल

कार्याध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

म. श्री. छगन भुजबळ

ज्येष्ठ नेते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

म. श्री. नवाब मलिक

ज्येष्ठ नेते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर मंत्री

श्री. अजितदादा पवार – मा. उपमुख्यमंत्री – अर्थ व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री.

श्री. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण मंत्री

श्री. धनंजय मुंडे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री

श्री. दत्तात्रय भरने – क्रीडा व युवक कल्याण मंत्री, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री

श्रीमती. अदिती तटकरे – महिला व बालकल्याण मंत्री

श्री. माणिकराव कोकाटे – कृषी मंत्री

श्री. नारहरी झिरवाल – अन्न व औषध प्रशासन मंत्री, विशेष सहाय्य मंत्री

श्री. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन मंत्री

श्री. बाबासाहेब पाटील – सहकार मंत्री

श्री. इंद्रनील नाईक  – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण (राज्यमंत्री)

आमच्या मोहिमा

चला एकत्र, मुंबईच्या प्रगतीशील, सर्वसमावेशक भविष्याकडे वाटचाल करूया. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे, चांगल्या भविष्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये सामील व्हा|
श्री. सुनील गिरी
अध्यक्ष -राष्ट्रवादी युवक काँग्रेस (मुंबई)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये सामील व्हा

Follow us Social Media

social media-2